चंद्रपुर :-विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कंबर कसली असून सर्व विधानसभा क्षेत्रात प्रचार सुरु केला आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दौरा करीत आहेत.
Maha Vikas Aghadi best option for all common questions - MP Pratibha Dhanorkar
प्रचारादरम्यान नागरीकांशी चर्चा करुन सर्व सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी महाविकास आघाडी सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर व्यक्त केले आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या विकासातील सातत्य टिकवण्याकरिता महाविकास आघाडीचे प्रविण काकडे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माजरी येथील छठ पुजन च्या कार्यक्रमात केले. तसेच दि. 09 नोव्हेंबर 2024 रोजी गोंडपिपरी तालुक्यात विविध गावातील भेटी दरम्यान राजूरा विधानसभा क्षेत्रातील विकासामुख महाविकास आघाडी चे उमेदवार सुभाष धोटे यांना प्रचंड बहूमताने विजयी करण्याचे आवाहन देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीने उत्तम कार्य केले असून कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेची केलेली सेवा लक्षात घेऊन भविष्यात सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर व्यक्त केले आहे.About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment