Ads

ग्रामीण रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध करा.

जावेद शेख भद्रावती:-भद्रावती शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी आवश्यक असणारी पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल प्राप्त होण्यास चार ते पाच दिवसांचा दीर्घ कालावधी लागतो. या दिरंगाईमुळे रुग्णांचे योग्य रोगनिदान करता येत नसल्याने त्यांच्या आजारावर योग्य तो औषधोपचार करण्यास वेळ लागतो. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन त्वरित उपलब्ध करून येथे येणाऱ्या रुग्णांना दिलासा द्यावा अशा मागणीची निवेदन भद्रावती येथील आम आदमी पक्षा तर्फे ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांना सादर करण्यात आले.
Make pathology machines available in rural hospitals.
शहरातील ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील महत्त्वाचे रुग्णालय असून या रुग्णालयात शहर तथा तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने आपल्या आजारावर उपचारासाठी येत असतात. मात्र पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध नसल्याने त्यांना वेळेत योग्य तो उपचार मिळत नाही. सात दिवसांच्या आत रुग्णालयात पॅथॉलॉजी मशीन उपलब्ध न केल्यास याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा आप तर्फे सदर निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना आपचे सूरज शाह, सुमित हस्तक,पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment