राजुरा :-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील शिक्षक, विध्यार्थी व सेविका यांच्या परिश्रमाने परसबाग फुलली आहे.
The backyard garden at Asha Devi School is in full bloom.
आपण केलेल्या परिश्रमाला आलेलं फळ बघून विद्यार्थी आनंदी असुन आपण पिकविलेला ताजा भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरून त्याचा आस्वाद घेतांना मुलांना आनंद होतोय. परसबाग निर्मितीमुळे निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन विध्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो. ताज्या भाजिपाल्याचा समावेश पोषण आहारात होउन विध्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होतो. पालक, वांगे, टमाटर, मिरची, कोथिंबीर, मेथी आदींचा या परसबागेत समावेश आहे. शाळेचे मुख्याध्यापक दिपक सातपुते, सहाय्यक शिक्षक बंडू बोढे, दिपक मडावी, सोनाली नक्षिने, सविता गेडेकर, वैशाली बोबडे, नेहा तळवेकर यांच्या सहकार्याने शाळेच्या सेविका इंदिरा गुरूनुले यांनी स्वतः परिश्रम घेऊन विद्यार्थि सहभागाने ही परसबाग फुलवली आहे. याकरिता वरीष्ठ अधिकारी, शालेय व्यवस्थापन मंडळ, पालकांचेही सहकार्य लाभले आहे. शाळेतील परसबाग सोबतच परीपाठ सुद्धा वैशिषटयपूर्ण असून अगदी बालवाडी ते पाचव्या वर्गातील विद्यार्थी आनंददायी वातावरणात मंत्रमुग्ध होऊन ज्ञानार्जन करीत आहेत.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment