चंद्रपूर :-३१ डिसेबर २०२४ अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेमधील अधिकारी व अंमलदार चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, रयतवारी बी.एम.टी चौक चंद्रपूर परीसरात श्रावण साविता रा. रयतवारी चंद्रपूर हा त्याचे राहते घरी पंतग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजाची लपुन विक्री करीत आहे,
अशा माहितीवरून श्रावणकुमार शिवकुमार सविता, वय २८ वर्षे, रा. रयतवारी कॉलनी, बी.एम.टी चौक, चंद्रपूर याचे राहते घरी रेड केली असता त्याचे घरी विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीवर गुडांळलेला प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा असलेल्या चक्रया, असा एकुण २४,०००/-रू माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी श्रावणकुमार शिवकुमार सविता, वय २८ वर्षे, रा. रयतवारी कॉलनी, बी.एम.टी चौक, चंद्रपूर याने त्याचे राहते घरी पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा अवैधरित्या विकी करीता साठवुन ठेवला तसेच नमुद प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा हा मानवी जिवितास तसेच पर्यावरण, पक्षी यांना घातक व धोकादायक असल्याचे माहिती असुन सुध्दा जाणिवपुर्वक स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्रीकरीता ताब्यात बाळगले आहे. करीता त्याचेविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३,२९२,२९३ सहकलम ५,१५पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे रामनगर करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री. सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक यांचे सुचनेप्रमाणे श्री.दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, श्री. संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, पोलीस नाईक संतोष येलपुलवार, अंमलदार गोपीनाथ नरोटे, गोपल आतकुलवार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment