Ads

आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने निशुल्क चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर :- आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात डोळे तपासणी केलेल्या नागरिकांना आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते निशुल्क चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी जवळपास 300 नागरिकांना लाभ घेतला. आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
MLA Kishore Jorgewar Mitra Parivar organized a free spectacle distribution program
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका शिला चव्हाण, माया उईके, कल्पना शिंदे, राशिद हुसेन, सुमित बेले, पंकज बेले, नकुल वासमवार, विश्वजित शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
17 डिसेंबरला भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुकुम येथेही आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 500 हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान केले.
दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात सदर शिबिरात डोळे तपासणी करण्यात आलेल्या पात्र नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ चष्मे वाटप करण्यापुरता मर्यादित नाही, तर आपल्या समाजाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. डोळे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहेत. दृष्टी चांगली असेल, तर आपले जीवन अधिक चांगल्या पद्धतीने घडवता येते. त्यामुळे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे चष्मे घेणे शक्य नव्हते, त्यांना मदत करण्याच्या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात जवळपास 300 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment