MP Dhanorkar's helping hand to a girl suffering from cancer.
राजुरा येथील एका बालिकेला कॅन्सर असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांना कळले. तिचा उपचार मुंबई येथील रिलाएन्स हॉस्पीटल येथे सुरु असल्याचे तिच्या पालकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना सांगितले. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व मुलीला कर्करोग असल्याने आर्थिक मदत करण्याचे आवाहन पालकांनी खासदार धानोरकर यांना केले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर पाल्यांना मदतीचे आश्वासन देऊन सतत पाठपूरावा करुन सदर मुलीच्या उपचाराकरीता प्रधानमंत्री सहायता निधीतून 3 लक्ष रुपये मिळवून दिले. सदर रक्कम दवाखान्याला मिळणार असून त्यातून सदर मुलीचा उपचार केला जाणार आहे. खासदार धानोरकर यांच्या प्रयत्नामुळे सदर मुलीच्या पालकांनी खासदार धानोरकर यांचे आभार मानले आहे.
कॅन्सर पीडित बालिकेला खासदार धानोरकर यांचा मदतीचा हात.
चंद्रपुर :- खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या मतदार संघातील नागरीकांसाठी मदतीला धावून येत असल्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. मागील काही महिन्यांआधी चंद्रपूर सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याला देखील मदतीचा हात दिला होता.
0 comments:
Post a Comment