वरोरा:-गेल्या दीड वर्षापासून रेती घाटांचे लिलाव होत नसल्याने व बहारी जिल्ह्यात महागडी रेती उपलब्ध होत असल्याने निवडणुकीमध्ये व्यस्त असलेल्या महसूल अधिकाऱ्यांचा फायदा घेत काही छोट्या वाळू तस्करांनी अवैध वाळू तस्करी सुरू केली. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार योगेश कौटकर यांनी स्वत: त्यांच्या पथकासह करंजी रेती घाट, तुळाणा रेती घाट, खांबाडा, सुर्ला तसेच तहसीलच्या इतर रेती घाटांवर मध्यरात्री सापळा रचून तीन वाळू भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करून ते जप्त केले.आणि तहसील कार्यालयात जमा केले.
त्यांच्यावर सुमारे साडेतीन लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईने वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. रेतीघाट लिलावाअभावी चोरीला जाणाऱ्या वाळूचे भाव जास्त असल्याने अनेक बांधकामांवर परिणाम झाला आहे. बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांवरही त्याचा परिणाम होत आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी रेती घाटांचा लिलाव करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
0 comments:
Post a Comment