चंद्रपूर : येथील तडाळी एम. आय. डी. सी तील ओमेट वेस्ट लिमिटेड संगम स्टील ( सिद्धबली इस्पात ) कंपनीत सुरक्षेत हयगय केल्यामुळे 16 जानेवारी रोजी सकाळच्या दहा वाजताच्या सुमारास भट्टीत ब्लास्ट झाल्याने तीन कामगार सिकंदर यादव वय 35 वर्ष रा. गाजीपूर उत्तर प्रदेश, लल्लन वर्मा वय 25 वर्ष रा. सतना मध्य प्रदेश, व निखिल वागळे चिंचाळा हे या स्फ़ोटात भीषण रित्या भाजल्याने त्यांना डॉ कुबेर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यापैकी सिकंदर यादव यांची प्रकृती अत्यन्त चिंताजनक असल्यामुळे त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले.
Congress leaders meet accident-affected workers of Sangam Steel Company (Siddhabali)
यापूर्वी ही या कंपनीत अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या असल्याचे कामगारांनी सांगितले आहेत
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल नरुले व घुग्घूस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी डॉ. कुबेर यांच्या रुग्णालयात जाऊन कामगारांची भेट घेऊन त्यांची आस्थेने चौकशी केली
व त्यांना पूर्ण न्याय मिळवून देण्याचा आश्वासन दिले
ओमेट वेस्ट लिमिटेड ही कंपनी कामगारांच्या सुरक्षेत लापरवाही करीत असून कामगारांना सुरक्षा साधने पुरविण्यात येत नाही.
कामगारांना किमान वेतन देण्यात येत नाही.कंपनीत स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या जात नसल्याच्या विरोधात तालुका काँग्रेस कमेटी व ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने येत्या आठवड्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेळण्याचा इशारा तालुकाध्यक्ष अनिल नरुले, राजुरेड्डी यांनी दिले
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, तालुका सचिव विशाल मादर, थॉमस अर्णकोंडा, कुमार रुद्रारप, आयुष आवळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment