जावेद शेख भद्रावती:-नवी दिल्ली येथे प्रजासक दिनाच्या परेड कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून तालुक्यातील भटाळी येथील सरपंच सुधाकर रोहनकर व त्यांच्या पत्नी नीलिमा सुधाकर रोहनकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
Sarpanch Sudhakar Rohankar of Bhatali invited to the Republic Day program in Delhi.
त्यांच्या रूपाने हा मान प्रथमच भद्रावती तालुक्याला मिळाला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ग्रामपंचायत सरपंचांची केंद्र शासनाच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली,यात सुधाकर रोहनकर यांचा समावेश आहे. दिल्ली येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सुधाकर रोहनकर हे सापत्नीक उपस्थित राहणार आहे. सदर मान त्यांना मिळाल्याबद्दल भद्रावती तालुक्यातील सरपंच संघटना तथा विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.
0 comments:
Post a Comment