चंद्रपुर :-माजी नगरसेविका तथा उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष माननीय छबुताई वैरागडे यांनी राबविलेल्या 5000 वृक्ष लागवड तथा 3000 रेन वॉटर हार्वेस्टिंग संबंधित प्रकल्प आढावा अहवाल माननीय राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आला.
चंद्रपुरात 16 ते 18 जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लाइमेट चेंज 2025 चे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिनांक 16 जानेवारीला राज्यपालांच्या उपस्थितीत सदर अहवाल राज्यपाल महोदयांना सादर करण्यात आला. कार्यक्रमाला हजारोंची उपस्थिती लाभली होती तसेच राज्यपाल महोदयांनी देखील या अभिनव उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. यासाठी आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे विशेष सहाय्य आणि मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे मनपा आयुक्त विपिन पालीवाल सर यांनी देखील सहाय्य केले तर साक्षी कार्लेकर व इतर सदस्यांचे देखील बहुमूल्य सहकार्य लाभले .
एक झाड ताईचे मायेच्या सावलीचे या उपक्रमात सहकार्य लाभले सर्वं उत्कृष्ट महिला मंच सदस्य चे खूप खूप आभार
0 comments:
Post a Comment