जावेद शेख भद्रावती :-हॉटेलमधून जेवण आटोपुन दुचाकीने घरी जात असताना हायवेवर यु टर्न घेताना दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना दिनांक 31 रोज मंगळवारला रात्रो 9.30 वाजताच्या सुमारास शहरालगत चंद्रपूर नागपूर हायवे वरील डाली पेट्रोल पंप जवळ घडली.
.Three people died in a horrific truck-bike accident
वणी तालुक्यातील रासाघोणसा येथील एक कुटुंब भद्रावती येथे आपल्या नातेवाईकाकडे आले होते. दरम्यान शहरालगत असलेल्या नातेवाईकाच्या मालकीच्या हॉटेलमधे जेवण केल्यानंतर हे कुटुंब एमएच 29 ए झेड 99 49 या दुचाकीने आपल्या नातेवाईकाच्या घराकडे परत जात असताना हायवेवर यू टर्न घेताना समोरून येणाऱ्या एम एच 40 एके 20 95 या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मंजुषा सतीश नागपुरे वय 47 वर्षे यांचा जागीच तर सतीश भाऊराव नागपुरे वय 51 वर्ष व माहिरा राहुल नागपुरे वय दोन वर्षे या बालिकेचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. तर स्मायली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली. ट्रक चालक नंदू चव्हाण राहणार पुसद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment