चंद्रपुर :-दिनांक १२/०३/२०२५ रोजी पोउपनि विनोद भुरले, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस स्टॉफसह मा. पोलीस अधिक्षक सााहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच आर्म अॅक्ट कारवाई करण्याकरिता रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना
मुखबिर व्दारे खबर मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी संगम संभाजी सागोरे, वय-२८ वर्ष, रा. मित्रनगर, आंबेडकर कॉलेज मागे, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर हा स्वतः जवळ अग्निशस्त्र (हत्यार) बाळगुन चुनाभट्टी बस स्टॉफ येथे बसलेला आहे अशा खबर वरून नमुद आरोपीस पंचा समक्ष ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक लोखंड गावठी बनावटी देशी कट्टा तसेच एक नग जिवंत ९ एम. एम. काडतुस जप्त करून नमुद आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन, बल्लारपुर जि. चंद्रपुर येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास करिता पोस्टे बल्लारपुर येथे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा ,सुभाष गोहोकार, पोहवा,सतिश अवथरे, पोहवा , रजनिकांत पुठ्ठवार, पोहवा,दिपक डोंगरे, पोशि,प्रशांत नागोसे, पोशि,किशोर वाकाटे, पोशि,शशांक बदामवार, पोशि ,अमोल सावे, चापोहवा,दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment