Ads

पत्रकार राजेश येसेकार यांना समाज भुषण पुरस्कार

भद्रावती जावेद शेख : महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणी येथे नुकताच शेतकरी मंदिर येथे नाभिक समाजाचा उपवधू वर परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला होता यावेळी हा पुरस्कार देण्यात आला.
Journalist Rajesh Yesekar gets Samaj Bhushan Award
महाराष्ट्र नाभिक महामंडळ नेहमीच समाज कार्यात चांगल्या संकल्पनांना वर्षानुवर्षे प्रोत्साहित करीत आहे. नवसंकल्पना आणि उमेदिने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजातील जेष्ठांच्या व तरुणांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तर्फे पुरस्कार देण्यात येतात. राजेश येसेकर यांच्या जिवनातील सव्वीस वर्षच्या पत्रकारीतेतुन समाज कार्याची दखल घेऊन मा. श्री. कल्याणजी दळे साहेब महाराष्ट नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष यांच्या हस्ते यांना समाज भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमातचे अध्यक्ष म्हणुन कल्याणजी दळे महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रांताध्यक्ष, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेंद्र भाऊ नागपुरे यांच्या हस्ते झाले .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. गजाननराव वाघमारे अमरावती विभागीय अध्यक्ष व निवृत्ती पिस्तूलकर सर व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित होते.

*हा माझा पुरस्कार म्हणजे माझ्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे. या सन्मानामुळे आयुष्याचा आजवर केलेली मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणाबध्दल अभिमान वाटतो. हा पुरस्कार मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करुन देत राहील हा माझ्या आयुष्यातील विशेष भाग्याचा दिवस आहे. असे पत्रकार राजेश येसेकर यांनी यावेळी सांगितले.*

या कार्यक्रमाचे यशस्वीते करीता श्री. शशिकांत उर्फ गुड्डू नक्षणे महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण टीमने सहकार्य केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सर्वश्री डुडुभाऊ नक्षीणे, दिलिपभाऊ वानकर, दिपकभाऊ नक्षिणे, रविंद्र येसेकर, सचिन नक्षिणे, हरीश घुमे, हणुमान नक्षिणे, सागर घुमे, पियुष घुमे, पांडुरग हणुमंते, बंडु व्ही लांडगे, नितिन नागमोते, होमराज घुमे शेगाव, अभिजीत आसरे, स्मिता आसरे पुणे, विजयराव आसरे, कविताताई आसरे नागपुर, लता येसेकर, कल्पना क्षिरसागार, चंद्रकांत येसेकर, मिणाताई येसेकर, निळकंठराव तायडे नेर,तुषार डहाके दारव्हा, ‌व‌ सर्व समाज बांधव यांनी अभिनंदन करुन पुढिल कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment