जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती:-
पेट्रोलिंग दरम्यान रेतीची अवैध तस्करी करीत असणाऱ्या एका ट्रॅक्टर वर कारवाई करीत सदर ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती पोलीस विभागातर्फे दिनांक 25 रोज मंगळवार ला पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास तालुक्यातील आष्टी फाट्याजवळ करण्यात आली.
Police take action against tractors involved in illegal sand smuggling.
सदर कारवाईत 5000 रुपये किमतीची रेती व ट्रॅक्टर असा चार लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस पथकाचे या परिसरात पेट्रोलिंग सुरू असता एम एच 34 एल 87 36 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर द्वारे रेतीची अवैध तस्करी करण्यात येत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी अभिषेक मिलिंद बोरकर, वय 24 वर्ष व अनुप अंकुश गानफाडे, वय 25 वर्ष, राहणार आष्टी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार लता वाढवेयांच्या मार्गदर्शनात अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुधरी, जगदीश झाडे, निकेश ढेंगे, योगेश घाटोळे यांनी केली.
0 comments:
Post a Comment