चंद्रपूर : crime news जिल्ह्यात अवैधरीत्या सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून गोंडपिपरी पोलीस ठाणे हद्दीतील भंगारपेठ येथे छापा टाकत तीन आरोपींकडून तब्बल १ लाख १८ हजार ७३० रुपये किमतीचा तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई २४ मार्च रोजी करण्यात आली.
Illegal flavored tobacco and pan masala seized in Gondpipri: Local Crime Branch action
गोंडपिपरी तालुक्यात अवैधरीत्या सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने भंगारपेठ येथे छापा टाकला.
या कारवाईत मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू आणि पान मसाला जप्त करण्यात आला. आरोपी संजय अलगमकर, साईनाथ तांगडे, विनोद पोटे यांचा विरुध्द गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे कलम २२३, २७५, १२३ भारतीय दंड संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील कलम ३० (२) (a), २६(२) (iv), ३, ४, ५९ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.Illegal flavored tobacco
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा सुरेंद्र महंतो, पोअं प्रफुल गारगाटे, आणि चालक पोशि मिलींद टेकाम यांनी केले.
0 comments:
Post a Comment