बल्लारपूर : बल्लारपूर पब्लिक स्कूल येनबोडीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 'माझी शाळा सुंदर शाळा 'या प्रतिष्ठित स्पर्धेत बल्लारपूर तहसील मधून द्वितीय क्रमांक मिळवून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाळेला सन्मानचिन्ह आणि ₹२०००००/- रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
Ballarpur Public School Yenbodi's Maji Shala Sundar Shala competition achieved a brilliant performance by securing second place.
ही उत्कृष्ट कामगिरी संपूर्ण शाळा कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांचे व निस्वार्थ समर्पणाचे फलित आहे. या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वासाडे सर , व्यवस्थापक प्रो.मेघा शुक्ला मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्स्ना बाबुलकर मॅडम, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी प्रयत्नांना जाते.
हे यश बल्लारपूर पब्लिक स्कूल येनबोडीच्या दूरदर्शी विकास दृष्टिकोनाचे आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रती असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. भविष्यात शाळेची कीर्ती अधिक वृद्धिगत करण्यासाठी शाळा कुटुंबाने सतत प्रगती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे .
0 comments:
Post a Comment