वरोरा:येथील उद्योजक गौरव नरेश बोरा यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपला ३२ वा जन्मदिवस आनंदवनातील वृद्धाश्रमातील 200 कृष्ठरोग्यांना भोजन देऊन आपला जन्मदिवस साजरा केला.
वाढदिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्माचा दिवस हा दिवस सामान्यतः त्या व्यक्तीच्या कुटुंबासोबत,मित्र मैत्रिणीसोबत,किंवा इतर जवळच्या लोकांसोबत साजरा केल्या जातो. वाढदिवशी केक कापणे, भेटवस्तू देणे,पार्टी करून पैशाची उधळण करण्याची एक प्रथा झाली आहे.परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत श्रद्धेय बाबा आमटे,साधना आमटे यांनी ज्यांना समाजाने,कुटुंबाने झिडकारले अशा वृध्द कृष्ठ रोग्यांना सहारा देऊन त्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारून त्यांना समाजात ताठ मानेने जीवन जगता यावे यासाठी आनंदवनात फुलविलेल्या वृद्धाश्रमात कोणताही मोठा उत्सव न करता वृध्द कृष्ठरोग्यांना भोजन देऊन गौरव बोरा यांनी आपला जन्मदिवस साजरा केला.
0 comments:
Post a Comment