चिमूर : खाऊ घेऊन देण्याचे आमीष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना बुधवारी (दि.16) वरोरा येथील सञ न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.Abuse of minor girls
Those 'homicidal' accused sent to judicial custody
त्यामुळे आरोपी नसिर वजीर शेख (48), रशीद रूस्तम शेख (58) यांची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.चिमुर शहरातील 13 व 10 वर्षाच्या दोघी मैत्रिणींवर खाऊ देण्याचे आमीष दाखवून त्याच वार्डातील आरोपी आरोपी नसिर वजीर शेख व रशीद रूस्तम शेख यांनी वारंवार अत्याचार केला. सोमवारी अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर त्याच रात्री पिडीतेच्या आईने चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. त्याच रात्री माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे चिमूर शहरात प्रचंड आक्रोश निर्माण झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपींवर कठोर कारवाई मागणी करण्यात आली. रात्री 3 वाजेपर्यंत संतप्त जमावाने चिमुर पोलिस ठाण्याला चार तास घेराव घातला होता. त्याच रात्री दोन्ही आरोपी स्वत: शरण आले. त्यांचेवर कलम 64, 64 (2) (एम), 65 (1) 65(2) सहकलम 4,8 अन्वये गुन्हे दाखल करून पौक्सो कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. मंगळवारी (दि.15) त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
पोलिस कोठडी संपल्याने बुधवारी पुन्हा दोन्ही आरोपींना वरोरा येथील सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोघांचीही तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment