Ads

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे वरोरा येथे बेमुदत काम बंद आंदोलन Land records employees protest indefinite work stoppage in Warora

सादिक थैम वरोरा तालुका प्रतिनिधी:विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती - नागपूर या विभागीय संघटनेशी संलग्नित भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या येथील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक वेतनश्रेणी पदभरती व इतर मागण्यांना घेऊन २६ मे सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले.
Land records employees protest indefinite work stoppage in Warora
बेमुदत काम बंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आंदोलनात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांनी आमदार करण देवतळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यात भूमि अभिलेखच्या सर्व कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी, परिरक्षक भूमापक यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, वर्जन २ व ईपिसीआयएस साईट सुरळीत करण्यात यावी, सर्व सर्वेअर यांना रोवर व लॅपटॉप उपलब्ध करून द्यावे, वर्ग दोन व तीन च्या रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित देण्यात याव्या, नवीन नगर भूमापन कार्यालयांची स्थापना करण्यात यावी. शासन निणऱ्याप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील पदनामांमध्ये बदल करण्यात यावा. इत्यादी बाबींची समावेश आहे. 
 आमदारांच्या मार्फतीने कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर दिवसभर कामकाज बंद ठेवण्यात आले.
 सद्या शेती हंगामाचा काळ असून अनेक मोजणीची कामे प्रस्तावित आहेत. इतर कागदपत्रांसाठी सुद्धा या कार्यालयात आलेल्या अर्जदारांना काम बंदचा फटका बसत आहे . काम बंद आंदोलनामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागले. 
            या बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये मुख्य सहाय्यक सचिन पवार,नारायण गुलाने निमतनदार, वंदना चिंचोलकर निमतनदार, नजूल सर्वेक्षक विनोद सोनुरकर , स्वरूप गौरकर,संदीप निमडगे, त्रिशाला जांभूळकर, स्वाती ताराम, अंकिता मुळे, सत्यम घोडमारे, दत्ता जाधव, राहुल काटकर, प्रेमानंद डोंगरे, रुपाली नैताम यांचा सहभाग होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment