मुंबई :- चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याचा गंभीर मुद्दा आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात ठामपणे उपस्थित केला.
If the benefits of medicines are not reaching the patients, what is the use of purchasing them - MLA Kishor Jorgewar
रुग्णालय प्रशासनाकडून औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, मात्र डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला असून, औषधांचा लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत नसेल, तर खरेदीचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी अधिवेशनात बोलताना उपस्थित केला आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार सातत्याने चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांकडे मंत्री यांचे लक्ष वेधत आहेत. परिणामी नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे वाटप करण्याचा निर्णय आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी लवकरच बैठक लावण्याचा शब्द संबंधित मंत्री यांनी दिला आहे. तर आज अधिवेशनात बोलताना त्यांनी शासकीय रुग्णालयातील प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना औषध खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींना सातत्याने प्राप्त होत आहेत. हॉस्पिटलमध्ये औषधांचा साठा असूनही रुग्णांना बाहेरून औषध घेण्यास सांगितले जाते. परिणामी, गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अधिवेशनात बोलताना विचारले की, शासनाच्या खर्चाने खरेदी केलेली औषधे जर रुग्णांपर्यंत पोहोचत नसतील, तर त्या औषध खरेदी यंत्रणेचा उपयोग तरी काय ? केवळ कागदोपत्री उपलब्धता दाखवून चालणार नाही. रुग्णांच्या हाती औषध पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रुग्णांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.
तसेच राज्यभरातील औषध व फर्निचर खरेदी प्रक्रियेबाबतही आमदार जोरगेवार यांनी गंभीर आरोप केले आहे. ज्याने निधी आणला त्याच्या मर्जीतल्या कंत्राटदारालाच काम देण्याचा काहींचा आग्रह असतो परिणामी काही ठराविक पुरवठादारच सातत्याने टेंडर प्रक्रियेत सहभागी होतात आणि सगळी खरेदी त्यांच्याकडेच जाते. या प्रक्रियेत पारदर्शकता नाही, स्पर्धकांना संधी नाही, असा आरोप करत त्यांनी औषध खरेदीसाठी स्वतंत्र आणि पारदर्शक नियमावली तयार करून कोणत्याही ‘रॅकेट’ला प्रोत्साहन न मिळता योग्य स्पर्धा आणि दर्जेदार पुरवठा सुनिश्चित होईल, असे नियोजन करण्याची मागणी आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
वारकऱ्यांच्या सेवेत दुर्लक्ष नको, अपघात रोखण्यासाठी उपाय योजना करा – आ. किशोर जोरगेवा
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीसाठी पायी निघणाऱ्या लाखो वारकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी सरकारचे लक्ष या समस्येकडे वेधले.
दरवर्षी मोठ्या श्रद्धेने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. मात्र रस्त्यांवरील अपुर्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक अपघात घडतात आणि त्यातून दुर्दैवी जीवितहानी होते. अशाच एका दुरूखद घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी स्व. आकाश बनकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. अशा घटना केवळ एका व्यक्तीचा जीव जातो म्हणून मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची सरकारकडे जोरदार मागणी करताना ते म्हणाले कि,, वारकर्यांची ही पवित्र परंपरा अखंड राहावी, त्यांची सेवा हे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपघात टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी शासनाने गांभीर्याने स्वीकारावी. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करावी, अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सभागृहात केली.
0 comments:
Post a Comment