MLA Devrao Bhongale offers relief to citizens regarding increased house tax of Rajura Municipal Council, directs chief officers not to levy more than 20% tax
राजुरा शहरांत नऊ हजारहून अधिक मालमत्ता असून तब्बल पाच हजारहून अधिक नागरिकांनी ह्या वाढीव माळामत्ता करावर हरकत नोंदवली होती, नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष लक्षात घेता राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे ह्यांनी आज दिनांक २३ रोजी नागरिकांसमवेत मुख्याधिकारी ह्यांची भेट घेतली व ह्याबाबत तथ्यता जाणून घेतली, मुख्यधिकारी ह्यांनी सांगितले की राजुरा शहरात वर्ष २०१४ पासून मालमत्ता करात वाढ़ केलेली नाही, मागील दहा वर्षाच्या काळात अनेक नागरिकांनी कच्च्या घराच्या जागेवर पक्क्या घराचे बांधकामकेलेले आहे, अनेक नागरिकांनी बांधकामं क्षेत्रात वाढ़ केलेली आहे, शहरात २१०० हुन अधिक रिकामे प्लॉट होते तेव्हा त्या नागरिकांना रिकाम्या प्लॉट चे कर लागू होते परंतु आता त्यावर बांधकाम झाल्याने ह्या घराच्या बांधकाम क्षेत्राप्रमाणे करात वाढ करण्यात आली आहे, अनेक नागरिकांच्या मालमत्तेवर अत्यंत कमी मालमत्ता कर लावण्यात आला होता,काही नागरिकांनी घरगुती बांधकामाची पर वांगी घेउन व्यवसायिक बांधकाम केलेले आहे ह्या मालमत्तेचा सर्व्हे करून व मोजमाप करून त्यावर वाढीव कर आकरण्यात आला आहे, त्यामुळे ह्या सर्व मालमत्तेवर कर वाढवला नसून मालमत्तेचे प्रत्यक्ष मोजमाप करून कर आकारनी करण्यात आल्यामुळे त्यांनी ह्या मालमत्तेवर केलेल्या कर आकारणीचे समर्थन केले, आमदार भोंगळे ह्यांनी देखील ह्या मालमत्तेवर आकरण्यात आलेल्या समर्थन करताना ज्या मालमत्तामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नाही, नवीन बांधकाम झालेले नाही, बांधकाम क्षेत्रात वाढ़ झालेले नाही अश्या नागरिकांच्या मालमत्तेवर वीस टक्क्याहून अधिकची कारवाढ़ करू नये असे निर्देश नप मुख्याधिकारी ह्यांना दिले,शहरातील अतिक्रमणबाबत त्यांनी कुठलेही नवीन अतिक्रमण न होऊ देण्याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यधिकारी ह्यांना दिल्या, बैठकीला मुख्याधिकारी धुमाळ, भाजपचे शहर अध्यक्ष सुरेश रागीट, माजी नगरसेविका प्रीती रेक्कलवार, महिला आघाडी अध्यक्ष माया धोटे, सौ झवर,शहर महामंत्री मिलिंद देशकर बंडू वनकर, पूनम शर्मा, मंगेश श्रीराम, गणेश रेक्कलवार, गणेश बेले, बाबा बेग, सागर भटपल्लीवार श्रीकृष्ण गोरे,ह्यांच्या सह शहरातील नागरिक मोठया प्रमाणात उपास्थित होते,राजुरा नगर परिषदेच्या वाढीव गृहकर प्रकरणी आमदार देवराव भोंगळे ह्यांचा नागरिकांना दिलासा, MLA Devrao Bhongale offers relief to citizens regarding increased house tax of Rajura Municipal Council, directs chief officers not to levy more than 20% tax
राजुरा (प्रतिनिधी ) :- राजुरा नगरपरिषदेने नागरिकांना वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस दिल्या असून काही नागरिकांच्या करामध्ये तब्बल चौपट वाढ़ करण्यात आली आहे,
0 comments:
Post a Comment