चंदनखेडा (जावेद शेख) - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चंदनखेडा च्या वतीने आयोजित "एक पेड मॉ के नाम" या पर्यावरण पूरक अभियानांतर्गत २४० वृक्षांचे रोपण करण्यात आले. हा उपक्रम २३ जुलै २०२५ रोजी आश्रम शाळा चंदनखेडा च्या प्रारंगणात पडला याउपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक, विदयार्थी, गावातील सरपंच, उपसरपंच यांचे सहकार्य लाभले. वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणासोबत मातृत्वाला आदरांजली वाहण्याचा संदेश देण्यात आला.
Plantation of 240 trees at Chandankheda Ashram School under the "Ek Peed MAA Ke Naam" initiative
यावेळी चंदनखेडा गावातील प्रथम नागरीक सरंपच श्री नयन जांभुळे, उपसरपंच श्रीमती भारती उरकांडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनोने सर, श्री सुखराम भोयर (मा.शि.), श्री ज्ञानेश्वर असोनूले (मा.शि.), कु. सहारे (मा.शि.), कु. चांदेवार (मा.शि.), श्री. महेश दिवाकर गिरडकर (प्रा. शि.) श्री. ढेंगळे सर (प्रा. शि.), श्री पोटदुखे (अधिक्षक), कु. गाडगे मॅडम (महिला अधिक्षिका), श्री मडावी, श्री सायंकार इत्यादी वर्ग ४ कर्मचारी व सर्व विदयार्थी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विदयार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment