चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी आता भाविकांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाची सुवर्णसंधी घेऊन आली आहे. जिल्ह्यातील नामवंत देवस्थानांच्या दर्शनासाठी खास पॅकेज दूर सेवा सुरू करण्यात आली असून, त्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांकडून पॅकेज टूरला पसंती देण्यात येत आहे.Package tour
ST will create aTourism Philosophy in the district
'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद जोपासणारी लालपरी प्रवाशांसाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असते. नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली. त्यामुळे या काळात अनेकजण देवदर्शनासाठी जातात. चंद्रपूर जिल्ह्यातही अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत. या मंदिरात एकाच दिवशी जाण्याचा योग्य प्रवाशांना यावा या अनुषंगाने चंद्रपूर आगाराने 26 जुलैपासून पॅकेज दूर ही योजना सुरू केली आहे. सकाळी सात वाजता ही बस निघणार असून, त्याच दिवशी 4.50 वाजता बस परत येणार आहे. विशेष म्हणजे या पॅकेज दूरमध्ये इतर बसमध्ये लागू असलेल्या प्रवाशांच्या सर्व योजना लागू राहणार आहेत.
ही बस जिल्ह्यातील दोन भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाच्या दर्शनसाठी रवाना होणार असून बसच्या माध्यमातून जिल्ह्यातील महत्वपूर्ण ठिकाणांचे यावेळी दर्शन करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी महामंडळाच्या या योजनेचा लाभ घ्यावा तसेच आवश्यकता असल्यास एकत्रितरित्या बसची मागणीसुद्धा करावे.
स्मिता सुतवणे, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर
असे आहेत मार्ग
पहिला मार्ग : सोमनाथ, मार्कडा देव, चपराळा दर्शन
चंद्रपूर-अजयपूर-झोपला मारोती-मूल सोमानाथ-मार्कंडा देव-चामोर्शी-आष्टी-चपराळा-बल्लारपूर (कास्टर भांडार) चंद्रपूर
प्रवास दि. 27, 28 जुलै, ऑगस्ट महिन्यात 3, 4, 10, 11, 17, 18, 24, 25, तिकीट प्रौढांकरिता 418 व लहान मुलांकरिता 212
दुसरा मार्ग: शंकर देव, सिरपूर, भटाळा दर्शन
चंद्रपूर-धानोरा-गडचांदूर-अंमलनाला-शंकरदेव-कोरपना-सिरपूर-वणी-वरोरा-टेमुर्डा-भटाळा-आनंदवन-भद्रावती (विजासन, नागमंदिर व गणेश मंदिर) चंद्रपूर परत
प्रवास दि. 28 जुलै, ऑगस्ट 2, 3, 9, 10, 15,16, 17, 23, 24, 27 व 30 तिकीट प्रौढांकरिता 428 व लहान मुलांकरिता 217
0 comments:
Post a Comment