जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी:-भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून ओळख असलेल्या मौजा चंदनखेडा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सवात थाटा माठात साजरा करण्यात आला.
तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेले सांसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेले मौजा चंदनखेडा येथे नेहमीच धार्मिक सण असो किंवा शासकीय उत्सव असो हे मोठ्या थाटात साजरे केले जातात त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 79 वा वर्धापन दिन म्हणून मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्वप्रथम गांधी चौक चंदनखेडा येथील ध्वजारोहणाचा मान देण्यात आलेल्या या गावच्या उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व शाळा यांचे मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यानंतर लगेच ग्रामपंचायत कार्यालय चंदनखेडा येथील ध्वजारोहण गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश रामटेके ग्रामपंचायत सदस्य सौ मुक्ताताई सोनुले, सौ प्रतिभा दोहतरे, सौ रंजना हनवते ,सौ श्वेता भोयर सौ आशा नन्नवरे सौ सविता गायकवाड ,श्री निकेश भागवत ,श्री बंडुजी नीखाते ,श्री नाना बगडे, तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री मनोहर हनवते, पोलीस पाटील समीर खान पठाण ,तसेच गावचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच विद्यार्थी व गावकरी वर्ग उपस्थित होते
0 comments:
Post a Comment