घुग्घुस: येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंचातर्फे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० जुलै रोजी सामाजिक 'सेवा' उपक्रम राबविण्यात आले.
'Service' initiative by Sudhirbhau Mungantiwar Vichar Mancha at Ghugghus
भाजपाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री आणि महाराष्ट्राच्या जनतेचे विश्वासपात्र नेतृत्व आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहरात सामाजिक 'सेवा' उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचे आयोजन सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंच, घुग्घुसच्या वतीने करण्यात आले होते.
घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते आणि त्यांनी मनापासून आभार मानले.
स्थानिक वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना फळे व भोजनदान करण्यात आले. राजीव रतन चौकात ये-जा करणाऱ्या नागरीकांना भोजनदान करण्यात आले याप्रसंगी गोर गरीब, रिक्षाचालक व कामगारांनी मोठया संख्येत भोजनदानाचा लाभ घेतला.
सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंच चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष रवीश सिंग व माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधीरभाऊ मुनगंटीवार विचार मंच घुग्घुसचे शहराध्यक्ष राकेश दिंडीगाला यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमांचे सुधीरभाऊंच्या प्रेरणेने चालणाऱ्या कार्यसंस्कृतीचे कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी सुनील चिलका, गणेश उईके, मारोती जुमनाके, उमेश गुप्ता, सचिन वडस्कर, अविनाश जानवे, राहुल यदुवंशी, लड्डू चिलका, आशिष गुंडेटी, भीम यादव, रोशन मडगूल, लक्की तकल्ला, रोहित घोरपडे, राम यादव, सुरुज गिरी, सचिन तांड्रा, प्रिन्स चिलका यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
0 comments:
Post a Comment