Ads

अवैधरित्या बनावट देशी दारु वाहतुक करणाऱ्यावर LCB,चंद्रपूर ची कारवाई

सादिक थैम तालुका प्रतिनिधी
वरोरा: स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनिय बातमीदारांकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, यवतमाळ जिल्हयातून वरोरा मार्गे दारुबंदी जिल्हा वर्धा येथुन अवैध दारुची वाहतुक पिकअप वाहनाने होणार आहे.
LCB, Chandrapur takes action against those illegally transporting fake country liquor
यावरुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळया ठिकाणी नाकाबंदी केली असता मौजा माढेळी वरोरा रोडवरील नाकाबंदी पॉईन्टवर एक पिकअप वाहन क्रमांक MH27-X-8210 येतांना दिसल्याने त्यास थांबवून पंचासमक्ष सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये बनावट रॉकेट देशी दारुचे 90 mL च्या एकुण १५० पेटया किंमत ६,००,०००/- रु आणि गुन्हयात वापरलेली पिकअप वाहन किंमत १५,००,०००/- रु. व आरोपीचा मोबाईल असा एकुण २१,१५,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन आरोपी वाहन चालक नामे सागर अशोक परदेशी वय २७ वर्ष रा. भडगांव ता. चाळीसगांव जि. जळगाव यास अटक करुन त्याचे आणि पाहीजे असलेले आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्रमांक ४८०/२०२५ कलम १२३, ३१६, ३१८, ३४०, ४९ भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम ६५ (ए) (ई), ८३, ९० महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री विनोद भुरले, श्री संतोष निंभोरकर, श्री सर्वेश बेलसरे, श्री सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअं किशोर वाकाटे, नितीन रायपुरे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, संतोष येलपुलवार, सचिन गुरनुले, नितीन कुरेकार, मिलींद जांभुळे, चेतन गज्जलवार, प्रफुल्ल गारगाटे, दिनेश अराडे रिक्षब बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment