भद्रावती (चंद्रपूर) :
महाराष्ट्र स्टेट स्पोर्ट्स कौन्सिल, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र अमेच्युअर जिमनॅस्टिकस असोसिएशन तर्फे महाराष्ट्र स्टेट अक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिकस जज कोर्स व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. हा तीन दिवसीय कोर्स येत्या 29, 30 व 31 ऑगस्ट 2025 रोजी विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे पार पडणार आहे.
Maharashtra State Acrobatics Gymnastics Judges Course & Exam Bhadravati
या प्रशिक्षण कार्यक्रमाला फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल जिमनॅस्टिकस (FIG) व जिमनॅस्टिकस फेडरेशन ऑफ इंडिया (GFI) मान्यताप्राप्त इंटरनॅशनल अक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिकस एक्सपर्ट कोच आणि लेव्हल-01 जज मार्गदर्शन करणार आहेत.
🗓 कोर्स वेळापत्रक
29 ऑगस्ट शुक्रवार : सकाळी 09 वाजता रिपोर्टिंग. दोन सत्रे – सकाळी 10 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते 6.
30 ऑगस्ट शनिवार : सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते 6 अशी दोन सत्रे.
31 ऑगस्ट रविवार : सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 4 सत्रांनंतर दुपारी 4 ते 5 दरम्यान स्टेट लेव्हल जज परीक्षा होणार आहे.
या कोर्समध्ये केवळ 30 पुरुष व महिला क्रीडा शिक्षक आणि स्पोर्ट्स कोच यांनाच मर्यादित प्रवेश दिला जाणार असून नोंदणीची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे.
या आयोजनासाठी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन आणि आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपूर यांनी पुढाकार घेतला आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आयोजक दुर्गराज रामटेके, संस्थापक व सचिव, यांच्याशी (मो. 9067758618) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment