राजुरा २१ ऑगस्ट :-
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत कुस्ती स्पर्धेत आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा येथील चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले व विभाग स्तरावर त्यांनी आपले स्थान कायम केले.
Adarsh School selected for the Divisional level school wrestling competition. कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्यांदा नेत्रदीपक कामगिरी बजावली. कुस्ती खेळात वेगवेगळ्या वजन गटात १४ वर्षांखालील गटातून – सोहम लिंम्बाजी मुंडे, अमोघ मंगेश पहानपटे, मानव अनिल मोहितकर, १७ वर्षांखालील गटातून – दर्शन रमेश भटारकर यांची विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आदर्श शाळेचा विजयाचा झेंडा मानाने उंचावला आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव धर्मशील काटकर , सहसचिव जगद्गुरु व्यायाम शाळा चंद्रपूर तथा सचिव चंद्रपूर शहर तालीम संघ, वाल्मीक खोब्रागडे ॲड.इंजि. प्रशांत घरोटे, राजुरा तालुका क्रीडा संयोजक हरिश्चंद्र विरुटकर, संस्थेचे अध्यक्ष सतिश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, सह सचिव शंकरराव काकडे, कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकीवार, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे , आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, क्रीडा शिक्षक बादल बेले , रूपेश चीडे, शिक्षकवृंद , क्रीडा शिक्षक प्रशिक्षक प्रकाश आमनर, भास्कर फरकाडे, हर्षल क्षीरसागर, भार्गवी कोडाली , पालक लिंबाजी मुंडे, हरिश्चंद्र सोलनकर, पुजा घरोटे, यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 comments:
Post a Comment