✍️ मुल प्रतिनिधी:-
मुल शहरात अवैधरित्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना मुल पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून १७९ ग्रॅम गांजा, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण १,०४,८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Two youths arrested for possessing ganja; Goods worth Rs. 1,04,80/- seized
🔎 कारवाई कशी उघडकीस आली?
२१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी मुल पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, जुना सोमनाथ मंदिर परिसर, मुल रेल्वे स्टेशन भागात दोन युवक विक्रीसाठी गांजा घेऊन फिरत आहेत. तत्काळ पोलिसांनी पथक तयार करून तेथे सापळा लावला.
झडतीदरम्यान बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. MH34-CE-6620) च्या मागील सीटखाली विक्रीसाठी ठेवलेला १७९ ग्रॅम सुकलेला गांजा (किंमत ३,५८०/- रु.), रोख ५००/- रुपये व सदर मोटारसायकल असा एकूण १,०४,८०/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
👮 अटक आरोपींची नावे
रोहीत प्रेमलाल कोवे (वय २० वर्षे)
आदित्य उर्फ बुलेट उमाजी मडावी (वय १९ वर्षे) (दोघे रा. येरगाव, ता. मुल)
या दोघांविरुद्ध पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्र. ३४०/२०२५, कलम ८(सी), २०(बी), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📌 अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि. सुबोध वंजारी, अमितकुमार आत्राम, पोहवा. भोजराज मुंडरे, पोहवा. इंदल राठोड, नापोअ. चिमाजी देवकते, पोअं. नरेश कोडापे, पोअं. शंकर बोरसरे आदींचा समावेश होता
सदर प्रकरणी पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
0 comments:
Post a Comment