माजरी, ता. भद्रावती (प्रतिनिधी जावेद शेख) :-
माजरी पोलीस ठाण्याच्या दक्ष व तत्पर कार्यवाहीमुळे अल्पवयीन मुलगी अवघ्या २४ तासांच्या आत सुरक्षितपणे सापडली आहे.
Majri police locate minor girl within 24 hours
दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पाटाळा येथील अल्पवयीन मुलगी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आजोबांच्या घरून कोणालाही न सांगता निघून गेली होती. नातेवाईकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती मिळून आली नसल्याने तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत मुलीच्या मामाने पोलीस ठाण्यात तोंडी रिपोर्ट दिला. त्यावरून माजरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ७०/२०२५, कलम १३७(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास करताना माजरी पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे जाऊन अल्पवयीन मुलीचा शोध लावला व तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
ही कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधीक्षक तसेच मा. एसडीपीओ वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत ग्रे. पोउपनि. पंचोडबरिया, पोअंम प्रमोद मिलमिले, पोअंम अनिस शेख, पोअंम चेतन मडावी, पोअंम रविंद्र कन्नाके, पोअंम ज्ञानेश कोटरंगे व महिला पोअंम वैष्णवी भुरसे यांनी विशेष मेहनत घेतली.
या प्रकरणाचा पुढील तपास ग्रे. पोउपनि. पंचोडबरिया हे करीत आहेत.
👉 माजरी पोलीसांच्या जलद व प्रभावी कार्यवाहीचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.
0 comments:
Post a Comment