चंदनखेडा (प्रतिनिधी) –
महात्मा गांधी तंटामुक्ती समिती संसद आदर्श ग्रामपंचायत चंदनखेडा व वीरांगना मुक्ताई पुरुष स्वयंमसाहता शेतकरी बचत गट चरूर धारापुरे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदी बैल तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन ग्राम समाजभवन येथे करण्यात आले.
Nandi Bull Tanha Pola celebrated with enthusiasm at Chandankheda
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य मारोतीभाऊ गायकवाड, समाजकार्यकर्ते गजेंद्र रणदिवे, तंटामुक्ती सदस्य सिंगलदीप पेंदाम, पोलिस पाटील दुर्गाताई केदार, ग्रामपंचायत सदस्य आशाताई नन्नावरे, अंगणवाडी सेविका सुषमाताई घरत, आशा वर्कर सीमाताई केदार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजूभाऊ ऊरकांडे, तंटामुक्ती सदस्य शारदा ऊरकांडे, अध्यक्ष वीरांगना मुक्ताई पुरुष स्वयंमसाहता शेतकरी बचत गट अमोल दडमल, तसेच आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्रामशाखा चरुर धारापुरे चे अध्यक्ष रोहित केदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल चौधरी यांनी केले. संचालन महेश केदार यांनी तर आभार सौरभ दडमल यांनी मानले.
नंदी बैल सजावट स्पर्धेत दिव्यांशू केदार यांनी प्रथम, खुशी चौधरी यांनी द्वितीय तर पृथ्वीक नन्नावरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. एकूण 24 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांना शाळेच्या बॅगा, शूज, पर्स, छत्र्या, सन्मानचिन्ह, टिफिन बॉक्स, पाणी बाटल्या, रजिस्टर, पेन तसेच खाऊ वाटप (बिस्किट पुडे) यांचा समावेश असलेली पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमात नवनिर्मिती गुरुदेव भजन मंडळ चरुर धारापुरे यांनी सादर केलेल्या भजनांनी उत्सवाची शोभा वाढवली. स्पर्धकांचे पालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती लक्षणीय होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्रामशाखा चरुर धारापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment