राजुरा (प्रतिनिधी) – महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून नावारूपास आलेल्या उत्कृष्ट महिला मंच चंद्रपूर च्या वतीने राजुरा शाखेचा जल्लोषात उद्घाटन सोहळा साने गुरुजी सभागृह, देशपांडे वाडी येथे शेकडो महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला.
“Excellent Women's Forum” Rajura branch inaugurated with enthusiasm –
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला अध्यक्ष सौ. छबुताई वैरागडे, सौ. साक्षी कालेकर, सौ. प्रज्ञाताई जीवनकर (आकाशवाणी उद्घोषिका), सौ. वैशालीताई कन्नमवार, सौ. सरिता मंगरूळकर, सौ. अर्चना मंगरूळकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रेरणादायी मार्गदर्शन
अध्यक्षीय भाषणात सौ. छबुताई वैरागडे यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांद्वारे महिलांचा सर्वांगीण विकास घडविण्याचे आश्वासन दिले.
प्रमुख पाहुण्या सौ. प्रज्ञाताई जीवनकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक महिला ही एक बंद खजिन्याचे दालन आहे; योग्य व्यासपीठ मिळाल्यास तिची क्षमता उजागर होते.”
आकर्षक कार्यक्रम
उद्घाटन प्रसंगी वेशभूषा व उखाणा स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला मंचाच्या राजुरा शाखेतील सर्व संघटिका व नवीन सदस्यांनी उत्साहाने हजेरी लावली.
सूत्रसंचालन व आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीता बनकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. ललिता पिंपळकर यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 comments:
Post a Comment