Ads

पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा युवासेनेचा तीव्र निषेध; भद्रावतीत आंदोलन

भद्रावती जावेद शेख ता.३ :
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी "भगवा दहशतवाद नाही, तर हिंदू दहशतवाद / सनातनी दहशतवाद म्हणा" असे वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. या विधानाचा युवासेनेच्या वतीने गांधी चौक, भद्रावती येथे तीव्र निषेध करत जोरदार आंदोलन करण्यात आले.
Yuva Sena strongly condemns Prithviraj Chavan's controversial statement; Protest in Bhadravati
हे आंदोलन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना विदर्भ सचिव शुभम नवले, कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे, व युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनात तसेच माजी उपजिल्हाप्रमुख महेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात पार पडले. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, “सनातन संस्कृतीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, “भगव्या प्रती अपमान करणाऱ्यांना माफी मागावीच लागेल” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा संपूर्ण राज्यभर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी युवासेनेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात युवासेनेचे महेश जिवतोडे , शिवसैनिक सुरज शहा, सुमित हस्तक, शिवसेना उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम शिवसेना उप शहर प्रमुख ,मनीष बुच्चे, युवा सेना शहर प्रमुख सोनू बोनागिरी, राज चौहान, पीयुष सिंग, संदीप चटपकर, माजी सरपंच रवी ढवस, मुनेश्वर बदखल, यश निमसरकर, हेमंत सातपुते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनामुळे स्थानिक नागरिकांच्यातही असंतोषाची भावना निर्माण झाली असून, समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अशा विधानांचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment