Ads

अवैध कट्टा बाळगणारा सलमान खान जाळ्यात — गुन्हे शाखेची सापळा कारवाई यशस्वी!

बल्लारपूर (ता.प्र.) :
दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत सापळा रचून सलमान उर्फ राज सलीम खान (वय ३२, रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर) या इसमाला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडून अवैधरित्या बाळगलेला देशी बनावटीचा लोखंडी देशी कट्टा (किंमत अंदाजे ₹८,०००/-) जप्त करण्यात आला.
Salman Khan caught in the trap of possessing illegal country Pistol — Crime Branch's trap operation successful!
या प्रकरणी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्रमांक १०१५/२०२५ नोंदवून आरोपीवर कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, पोअं. नितीन रायपुरे, शेखर माथनकर, शशांक बादामवार, चापोहवा प्रमोद डंभारे, दिनेश अराडे यांनी मोलाची भूमिका बजावली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना धडा मिळाला असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा संदेश देणारी ही कारवाई ठरली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment