Ads

पडोली चौकात २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त – दोन आरोपी अटक

चंद्रपूर (दि. ६ सप्टेंबर) – स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने पडोली चौकात रचलेल्या सापळ्यातून तब्बल २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर / हेरॉईन जप्त करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कार, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण तीस लाख एकोणवीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. crime news
298 grams of brown sugar seized at Padoli Chowk – two accused arrested
गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. छोटू उर्फ नितीन शंकर गोवर्धन (वय ४२, रा. महात्मा फुले वार्ड, बाबुपेठ, चंद्रपूर) हा आरोपी त्याची कार (क्र. MH-34-BR-7765) ने चंद्रपूरमध्ये ब्राऊन शुगर विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीवर पडोली चौक येथे सापळा रचण्यात आला. कार तपासली असता गोवर्धन याच्या ताब्यात २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर मिळून आली. त्याच्यासोबत असलेल्या साथीदार साहिल सतिश लांबदुरवार (वय २३, रा. भिवापूर वार्ड, चंद्रपूर) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

सदर गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाईल, रोख रक्कम यासह एकूण ३०,१९,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन पडोली येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कामगिरीत पडोली पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश हिवसे, स्थागुशा सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, विनोद भुरले, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, सफौ धनराज करकाडे, स्वामी चालेकर, पोहवा नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, गणेश भोयर, जयसिंग, सुरेंद्र महंतो, सचिन गुरनुले, दिपक डोंगरे, विजयमाला वाघमारे, पोअं किशोर वाकाटे, शंशाक बादामवार, मिलींद जांभुळे, सुमित बरडे, अजित शेन्डे, प्रफुल्ल गारघाटे, चापोहवा प्रमोद डंभारे, मिलींद टेकाम तसेच सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांचा समावेश होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment