चंद्रपूर - गेल्या 4 दशकापासून दिव्यांग क्षेत्रात नीरलस व सातत्यपूर्ण योगदान देणारे विकलांग सेवा संस्था संस्थापक श्रीराम पान्हेरकर यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मानासाठी निवड झालेली असून दि.५ आक्टोंबरला एका विशेष कार्यक्रमात सन्मानपत्र ,स्मृती चिन्ह व धनादेश देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
Senior civil servant activist Shriram Panherkar from Vidarbha selected for the Senior Citizen Gratitude State Level Honor Award of Yashwantrao Chavan Pratishthan
श्रीराम पान्हेरकर यांनी व्यवसाय प्रशिक्षण, व्यसनमुक्ती, दिव्यांग सेवा, वृद्ध मार्गदर्शन, शिवभोजनद्वारा हजारो लाभार्थ्याना भोजन सेवा, प्राणी अन्न पुरवठा, नेपकिन वितरण क्षेत्रात आपला मौलिक वाटा उचललेला असून इतरही सामाजिक भान मनापासून दिलेले आहे याबद्दल त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाने डाँ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण व अन्य पुरस्कार देऊन गौरविलेले आहे तसेच स्मिता पाटील स्मृती पुरस्कार, झाडे फाऊंडेशनचा दिव्यांग सेवा पुरस्कार तसेच महावीर फाऊंडेशनचा महावीर महात्मा व अन्य पुरस्काराद्वारा गौरविलेले आहे.या प्रतिष्ठाप्राप्त जेष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मानसाठी विदर्भातील ते एकमेव पुरस्कार्थी आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना स्वकीय व हितचिंतक व अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलेले आहे.
0 comments:
Post a Comment