चंद्रपूर :
शहरातील इंदिरानगर चौकात एमएच 12 बीए 8873 क्रमांकाचा ट्रक मागील तीन दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी उभा होता. वाहतूक शाखेने या ट्रकला बाजूला करण्याची कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे अखेर आज अपघाताची घटना घडली. accident
Accident due to faulty truck at Indiranagar Chowk – major damage to car, loss of life averted
पावसाच्या सरी सुरू असताना नादुरुस्त ट्रकला संरक्षण म्हणून काही दगड लावण्यात आले होते. एमएच 34 सीएल 4020 क्रमांकाची कार वेगात जात असताना हे दगड कारला आढळले व कार उडून अपघात झाला. या धडकेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत वाहतूक शाखेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वेळेवर नादुरुस्त ट्रक हटवला गेला असता तर ही दुर्घटना टाळता आली असती, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.
0 comments:
Post a Comment