भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी :-
शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा पवित्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक परंपरेने ने साजरा करण्यात आला. पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Eid-e-Miladunnabi celebrated with enthusiasm in Bhadravati city
उत्सवाची सुरुवात सकाळी आठ वाजता
गरीब नवाज मज्जिद व मदिना मस्जिदयेथे व डोलारा प्रभाग इस्लामिक ध्वज फडकवून करण्यात आली. त्यानंतर नात शरीफांच्या मधुर स्वरात, हातात इस्लामिक झेंडे घेऊन मुस्लिम बांधवांची भव्य मिरवणूक निघाली. यामध्ये काढण्यात आलेली मक्का-मदीना आणि काबा शरीफ यांचे आकर्षक जाकी व घोडे बग्गी झेंडे पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले.
शहरभरात शांतता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देत मिरवणूक पुढे सरकली. रस्त्याच्या दुतर्फा मिठाई, शरबत व खाद्यपदार्थ वाटप करून नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. कोणताही अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनातकडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मिरवणूक भोजवाड व मदिना मज्जित भंगाराम वॉर्ड येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पंचशील वार्ड ते डोलारा तलाव वॉर्ड येथे खीर व मसाला भात चे आयोजन जुलसे मोहम्मद दिया यांच्याकडून करण्यात आली,चंद्रपूर नागपूर हायवे बाळासाहेब प्रवेशद्वार ते मेन रोड जामा मज्जिद चौक रोड मार्गे परत येथे दाखल झाली. तेथे मौलाना हाफिज अब्दुल गफार अन्सारी, हाफिज मुजमिल, मौलाना फारुख हाफिज कौनन रजा,यांनी पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जीवन, शिकवणुकीवर प्रकाश टाकत प्रेम, भाईचारा आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या उत्सवाच्या आयोजनात गरीब नवाज मज्जिद व मदिना,मशीद जामा मशीद च्या वतीने जिलेबी व मसाला भात चे वाटप करण्यात आले,नवीन पिढीने मोलाची भूमिका बजा,वली. त्यांच्या परिश्रमामुळे उत्सव मोठ्या यशस्वीपणे पार पडला.
भद्रावती शहरात ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने रोषणाईने उजळून निघाले होते. मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देवून प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचा संदेश दिला. यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ठाणेदार योगेश्वर पारधी, यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे माजी नगरसेवक चंदू खारकर मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव एकत्र होते
0 comments:
Post a Comment