सादिक थैम प्रतिनिधी वरोरा: विश्वाला अमन, शांती आणि बंधुतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त वरोरा शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात व शांततेत साजरी करण्यात आली. वरोरा मुस्लिम समाज व ईद मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने शहरभरात भव्य रॅली, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
In warora city, Eid-e-Milad-un-Nabi was celebrated with great enthusiasm
रॅलीत हजारो नागरिक, मौलाना, पदाधिकारी तसेच विविध मान्यवरांचा सहभाग होता. समाजबांधवांचे पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. अनेक मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शहरातील प्रमुख चौक व मार्गांवर रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
सर्व धर्मसमभावाचा संदेश देण्याच्या हेतूने गुरुदेव सेवा मंडळ, काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष तसेच विविध सामाजिक संस्थांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. खासदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी मुकेश जीवतोडे आदी मान्यवरांनी मुस्लिम समाजाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील आसिफ रजा, छोटू भाई शेख, जावेद रजा, इमरान शेख, शब्बीर शेख, शकील खान, मोहसिन रजा पठाण, जावेद अंसारी, जावेद शेख, साजिद पठाण यांच्यासह शहरातील विविध कमिट्यांचा सक्रिय सहभाग होता. काजीपुरा कमिटी, आजाद वार्ड कमिटी, कासमपंजा कमिटी, मालवीय वार्ड कमिटी, नई बस्ती समाजभवन कमिटी, कच्ची मस्जिद कमिटी, अब्दुल कलाम चौक येथील मिल्लते इस्लामिया कमिटी आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
रॅलीत सर्व समाजघटकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने वरोरा शहर बंधुता, ऐक्य व शांततेच्या संदेशाने दुमदुमून गेले.
0 comments:
Post a Comment