मंगी (बु.), ता.५ सप्टेंबर : स्मार्ट ग्राम मंगी (बु.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.Teacher's Day
Enthusiastic organization of Teacher's Day celebration at Smart Village Mangi (Bud.).
शिक्षक दिनाच्या निमित्ताने, एक दिवस आधीच स्वयंशासन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनाचे दायित्व निभावले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षक व्यवसायाची प्रत्यक्ष अनुभवात्मक जाणीव झाली तसेच शिस्त, जबाबदारी व अध्यापन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली.शिक्षकाची भूमिका निभावलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे नोटबुक व पेन भेट देण्यात आले.*
*मुख्य सोहळ्यात ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत शिक्षकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. समाजातील शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी शिक्षकांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.*
*या प्रसंगी स्मार्ट ग्राम मंगी(बु.)चे सरपंच शंकर तोडासे, उपसरपंच वासुदेव चापले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेंगोराव कोडापे,ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शरद पुसाम, अंगणवाडी सेविका शारदाताई शिरसागर व भिमबाई कन्नाके, शिक्षण परी शैला मडावी, अंबुजा फाउंडेशनचे क्रीडा मार्गदर्शक प्रगती ठोंबरे, शाळेचे मुख्याध्यापक मारोती चापले, इतर शिक्षक व पालक उपस्थित होते. शिक्षक पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष उत्साह प्राप्त झाला.*
0 comments:
Post a Comment