Ads

पाथरी परिसरात शेतकऱ्याचा बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद

सावली (ता. प्र.) :
सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपवनक्षेत्रात दोन दिवसांपूर्वी शेतकरी पांडुरंग भिकाजी चचाणे यांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी वाघीणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. अखेर वनविभागाने मोठ्या प्रयत्नांनंतर दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सदर वाघीणीला जेरबंद करण्यात यश मिळवले. पकडलेली वाघीण अंदाजे तीन वर्षांची असल्याचे सूत्रांनी सांगितले.
The tigress that killed a farmer in Pathri area has finally been captured.
तालुक्यातील शेतकरी सध्या वाघाच्या दहशतीत शेतीची कामे करत आहेत. हंगामातील शेतीकामासाठी शेतावर जाताना शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाथरी उपवनक्षेत्रातील नुकत्याच घडलेल्या घटनेने ही दहशत अधिकच वाढली होती. त्यामुळे वनविभागाने पिंजरे लावून मोहीम हाती घेतली व वाघीणीला पकडण्यात यश आले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

ही मोहीम मुख्य वनसंरक्षक रामानुजन, विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे, डॉ. कुंदन पोडशेलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पाटील, वनसंरक्षक अविनाश नान्हे, एकनाथ खुळे, दिनकर कराड, विनोद उईके, तसेच आर.आर.यू. टीम व पीआरटी टीम आदींचा सहभाग होता.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment