[चंद्रपूर प्रतिनिधी]:-
तेलंगणा सीमेलगत असलेल्या जिवती तालुक्यातील शेतकरी संघटना तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला. चंद्रपूर येथे झालेल्या ‘छोटे खाणी’ कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबिद अली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
Congress and farmers' organization office bearers from Jiwati taluka join NCP (Ajit Pawar group)
या कार्यक्रमात शब्बीर जागीरदार, बालाजी पुल्लेवाड, सुरेश निलेवाड, आरिफभाई पाटण, उद्धव गोतावळे (कुंभेझोरी) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी सर्वांचे दुपट्टे देऊन स्वागत केले.या वेळीस जिवती तालुका अध्यक्ष विजय गोतावडे उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष भटारकर म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस हा शाहू–फुले–आंबेडकर–मौलाना आझाद–यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पक्ष असून अजित दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते पक्षात दाखल होत आहेत.”
यापूर्वी जिवती तालुक्यात पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीत संधी देत नेतृत्व घडवले आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीतही तरुण, निष्ठावंत आणि सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिवती तालुक्यातील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक या पक्षात मिळेल, तसेच राज्याचे राज्यमंत्री (आदिवासी विकास व बांधकाम) तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री इंद्रनील नाईक यांच्या लवकरच होणाऱ्या दौऱ्यात जिवती तालुक्यातील दुर्गम भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहितीही भटारकर यांनी दिली.
या कार्यक्रमास जिवती तालुका अध्यक्ष विजय गोतावडे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment