भद्रावती (जावेद शेख) :
पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करून तीन गोवंश जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत एक पिकअप वाहनासह एकूण ५,४२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Illegal transportation of cattle; Bhadravati police crackdown, goods worth 5.42 lakh seized
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान अवैध वाहतूक करताना १) संतोष रामा थोरात (वय ४०, रा. डोंगरगाव, जिवती) व २) शेख दानिश शेख रसुल (वय २४, रा. देव्हाडा, राजुरा) यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईत
1. ३ नग गोवंश जनावरे – किंमत अंदाजे ४२,०००/- रु.
2. पिकअप वाहन क्र. MH34 BZ 9140 – किंमत अंदाजे ५,००,०००/- रु.
असा एकूण ५,४२,०००/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई ही पोलीस स्टेशन भद्रावतीची उल्लेखनीय कामगिरी असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 comments:
Post a Comment