राजुरा १८ डिसेंबर :-
महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाची राज्य स्तरीय कृतीसत्र सहविचार सभा व राजुरा तालुका कार्यकारणी निवड सभा नुकतीच पार पडली. आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे ही सभा संपन्न झाली.
Maharashtra Marathi Secondary Teachers Association's state level workshop and brainstorming session concluded. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष घनश्यामजी पटले, गोंदिया हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यवाह दुधराम राऊत, गोंदिया, नलिनी पिंगे,मुख्याध्यापिका आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा, सारिपुत्र जांभुळकर,मुख्याध्यापक आदर्श हायस्कूल राजुरा, रजनी शर्मा, सह संपादक, महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक मंडळ, डॉ. किशोर कवठे सदस्य, महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघ, राजबिंद्र डाहुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेचे महत्व, आवश्यकता, समाजातील मराठी भाषेचे स्थान, पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम यावर मत व्यक्त केले. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात तीन वेळा राज्य स्तरीय मराठी भाषेचे कृतिसत्र झाले असून चौथ्यांदा राजुरा येथे हे कृतिसत्र होईल तसेच संभावित तारीख १७ व १८ जानेवारी २०२६ असून याबाबत सविस्तरपणे कार्यकारणी बैठक घेऊन नियोजन करेल असेही ठरविण्यात आले. यावेळी राजुरा तालुका महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणीच्या मार्गदर्शकपदी रजनी शर्मा, अध्यक्षपदी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथील राजबिंद्र डाहुले, कार्यवाहपदी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील बादल बेले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर लवकरच तालुक्यातील मराठी भाषा विषय शिकविणाऱ्या अन्य शाळेतील शिक्षकांशी संपर्क करून कार्यकारणी विस्तारीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन व आभार बादल बेले यांनी केले. तर प्रास्ताविक रजनी शर्मा यांनी केले. यावेळी मोहनदास मेश्राम, जयश्री धोटे, आशिष नलगे, नितीन ठाकरे, अरुण मुसळे, गजानन दासरवार , लोमेश मडावी आदी सोबत आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील शिक्षक मोठ्यासंखेने उपस्थित होते. यावेळी राज्य स्तरीय कृतिसत्र करीता संभावित स्थळ म्हणून महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय परिसराची पाहणी करण्यात आली. तसेच घनश्यामजी पटेल व दुधराम राऊत यांचे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
---------------------------------------------
घनश्यामजी पटले, अध्यक्ष, महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ
शिक्षण प्रणालीत मराठी भाषेचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मराठी भाषेचा स्वाभिमान सर्वांनी जपायला हवा. राज्य स्तरीय मराठी भाषेचे कृतीसत्र हे मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी एक पर्वणी असून यात कृती संशोधन, कवि संमेलन, लोककला, स्थानिक संस्कृती, पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमावर यावर चर्चा होईल असे मत घनश्यामजी पटले यांनी व्यक्त केले.
----------------------------------------------
0 comments:
Post a Comment