Ads

भटाला येथे अवैध दारू विक्रीवर महिलांचा धाडसी प्रहार; एकास अटक

जावेद शेख, प्रतिनिधी – भद्रावती
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भटाला येथे गावातील सर्वसमावेशक महिलांच्या पुढाकारातून अवैध दारू विक्रीचा प्रकार रंगेहात पकडण्यात आला. 
Women's bold attack on illegal liquor sale in Bhatala; One arrestedगेल्या तीन दिवसांपासून गावातील महिला अवैध दारू तस्करांवर लक्ष ठेवून होत्या. आज पहाटे साडेसात वाजण्याच्या सुमारास सदाशिव जनार्दन जाधव (वय ५५, रा. भटाला) याला दारू विक्री करत असताना महिलांनी धाड टाकून पकडले.
शासकीय जागेवर गावकऱ्यांनी उभारलेल्या झोपडीत लपवून ठेवलेली दारू विक्रीसाठी साठवण्यात आली होती. कारवाईदरम्यान आरोपीकडून रोख रक्कम ₹२,५८० तसेच ९० एमएलच्या ५४ बाटल्या असा मुद्देमाल जप्त करून महिलांनी आरोपीसह शेगाव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले.
माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. त्यानंतर सदाशिव जनार्दन जाधव यास अटक करून पुढील कारवाईसाठी शेगाव पोलीस स्टेशनला सुपूर्त करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप पोले, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोकाटे व पोलीस कॉन्स्टेबल नितेश गजबे करीत आहेत.
गावातील महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे अवैध दारू विक्रीवर आळा बसण्यास मदत झाली असून त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment