Ads

मुलीची स्पर्धा परिक्षेची पुस्तके वाचनालयाला दान

भद्रावती / जावेद शेख : शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जुना सुमठाणा येथील शिवानी फर्निचरचे संचालक तथा उद्योजक यशवंत लिपटे यांनी एक आदर्श उपक्रम राबवित इयत्ता ११ वी व १२ वीच्या भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयांची तसेच जेईई या स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त पुस्तके सोमवारी घोडपेठ येथील सार्वजनिक वाचनालयाला दान केली. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकांमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी मदत मिळणार आहे.
Daughter's Competitive Exam Books Donated to the Library

पुढिल काही दिवसांत कॅट तसेच युपीएससी या स्पर्धा परिक्षांची पुस्तके वाचनालयाला भेट देण्यात येतील असे त्यांनी कळविले आहे. ही पुस्तके यशवंत लिपटे यांनी त्यांची मुलगी शिवानी हिच्याकरिता विकत घेतलेली आहेत. शिवानी हिने व्हीएनआयटी नागपूर येथून कम्प्युटर सायन्स विषयात बी. टेक केले आहे. पुढिल उच्च शिक्षणासाठी शिवानी दोन महिन्यांपुर्वी ऑस्ट्रेलिया येथे गेली आहे. ऑस्ट्रेलिया येथील मोनाश विद्यापीठातून शिवानी मास्टर डेटा सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे. मोनाश विद्यापीठाचा शिक्षणाच्या बाबतीत जागतीक क्रमवारीत ३६ वा क्रमांक लागतो.

आजच्या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार पुस्तकांची आवश्यकता असते. घोडपेठ येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून मोफत चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक वाचनालयात घोडपेठ व परिसरातील विद्यार्थी येतात. अशा वेळी या पुस्तकांच्या स्वरूपात मिळालेली मदत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. वाचनालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या पुस्तकांचा लाभ घेऊ शकतील, असा विश्वास यावेळी यशवंत लिपटे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी यशवंत लिपटे यांच्यासह वतन लोणे, हिमांशु रंगारी, समीर लोणे, अनिकेत दहिले, रोहन तुराणकर, शैलेश पिदुरकर, भुषण नांदे, हेमंत तोडासे, हर्षद सातपुते, मयुरी गहाणे, वैभव गोहोकर, आशिष घोटकर, प्राजक्ता शेडमाके उपस्थित होते. वाचनालयाच्या वतीने यशवंत लिपटे यांचे आभार मानण्यात आले व त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment