Ads

पडोलीजवळ ‘बर्निंग कार’चा थरार; चालक थोडक्यात बचावला

चंद्रपूर :
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर पडोली नजीक आज (६ एप्रिल २०२६) दुपारी एकच्या सुमारास धावत्या आलिशान कारला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली. काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण करत कोट्यवधी रुपयांची कार अक्षरशः जळून खाक झाली.
प्राप्त माहितीनुसार, ही कार चंद्रपूरमधील एका नामांकित व्यावसायिकाची असल्याचे सांगितले जात आहे. दुपारच्या सुमारास प्रवास सुरू असताना अचानक गाडीतून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी तात्काळ रस्त्याच्या कडेला उभी केली आणि स्वतः बाहेर पडले.
मात्र काही क्षणातच आगीने भयानक रूप घेत संपूर्ण गाडीला वेढा घातला. पाहता पाहता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि काही मिनिटांतच तिचा केवळ सांगाडा उरला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत सर्वस्व भस्मसात झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेमुळे काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment