चंदनखेडा:- शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चंदनखेडा चा दहावीचा निकाल ९०.३८ टक्के लागला परीक्षेला बसलेल्या 52 विद्यार्थ्यापैकी 47 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
संध्या राजेंद्र घरत ही विद्यार्थिनी 81 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक पूजा प्रकाश श्रीरामे 80.80 टक्के तर तृतीय दामिनी विनोद घरात हिने78.60 टक्के गुण घेतले. 07 विद्यार्थी विशेष गुणवत्ता मध्ये. 22 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 16 विद्यार्थी द्वितीय श्रेणी व 02 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले कापीमुक्त वातावरणातही आश्रम शाळेने सातत्याने यशाची परंपरा कायम राखली.
मागील दोन वर्ष शाळेचा निकाल 95% व 97% लागला होता यावर्षी या शाळेचा दहावीचा निकाल ९०.३८ टक्के लागला. मुख्याध्यापक श्री. जी. बी.सोनोने, माध्यमिक शिक्षक श्री.डी.बी. सोनुले, एस एफ भोयर. कुमारी एस जी सहारे, कुमारी बि.डी चांदेवार, महेश गिरडकर सर, किनाके मॅडम ,डेंगळे सर अधीक्षिका गाडगे मॅडम. अधीक्षक पोटदुखे सर, जय गोपाल सर, मडावी, सायंकार , लांडगे सर, तसेच आश्रम शाळेतील वर्ग चार कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
0 comments:
Post a Comment