चंद्रपूर :- स्व. बेबी बाई धनलाल गुंडे (वय ७७) यांचे दिनांक ५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्या रोशनीताई राजेश गुंडे व सोनू राकेश गुंडे यांच्या सासूबाई होत. त्यांचे निधन जटपुरा गेट, गणेश मंदिर मागे, राजेश गुंडे यांच्या निवासस्थानी झाले.
“Bequeathing a Legacy of Light Even After Death: A Tribute to Humanity Through the Eye Donation of the Late Baby Bai Gunde”
गुंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी एक अत्यंत प्रेरणादायी निर्णय घेत, स्वर्गीय बेबी बाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या डोळ्यांचे नेत्रदान केले. या उदात्त कार्यामुळे त्यांच्या जाण्यानंतरही कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश निर्माण होणार आहे, हा भावनिक आणि समाजासाठी मार्गदर्शक असा संदेश त्यांनी दिला.
नेत्रदान प्रक्रियेसाठी डॉ. मंगेश गुलवाडे व सौ. छबूताई वैरागडे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे हे पुण्यकार्य सुरळीत पार पडले.
स्व. बेबी बाई गुंडे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या प्रेमळ स्वभावाची व सेवाभावी वृत्तीची आठवण सर्वांच्या मनात कायम राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
0 comments:
Post a Comment