Ads

"विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम; 'बेजार शिक्षण व्यवस्था बदललीच पाहिजे'चा बुलंद आवाज

चंद्रपूर | प्रतिनिधी :-
नीट (NEET) पेपर लीक प्रकरण, ढासळलेली शिक्षण व्यवस्था आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात युवासेनेच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. जनता कॉलेज चौकात आयोजित या मोहिमेत नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सरकारविरोधात स्वाक्षरी करून आपला निषेध नोंदविला."Yuva Sena's signature campaign in Chandrapur to protest lathicharge on students; Loud voice of 'The useless education system must be changed'"
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पक्षाने नीट पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपुरात ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा तीव्र निषेध व्यक्त करत, देशातील शिक्षण व्यवस्था आमूलाग्र बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. नीट पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या प्रकरणात सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर युवासेना सातत्याने आवाज उठवत राहील आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या स्वाक्षरी अभियानात युवती जिल्हाप्रमुख रोहिणी वैरागडे, फैजल खान, मोहित टोंगे, आदित्य कन्नमवार, आदम घोंगडे, नैतिक शर्मा, श्रेयस हेडाऊ, विक्की गवाडे, अमोल दिखाडे, सोनल सोनाळकर, धम्मदीप खोब्रागडे, निखिल मोहरले, हरीश कपाटे, रितिक कुमरे, रितिक रायपुरे, अंश खोब्रागडे, अजय भसारकर, राहुल बारसगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment